dr.satish best web design developer for mac

येणेचवंडी ग्रामपंचायत :

गडहिंग्लज शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर असलेलं तालुक्यातील येणेचवंडी हे गाव. गाव आकाराने मोठं असल्यामुळे गावात निरनिराळ्या जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहताना पाहायला मिळतात. गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत. गावात मराठी व कन्नड बोलीभाषा असणारे लोक आहेत. गावातील ग्रामपंचायतीने लोकांच्या सहाय्याने गावात ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबविले आहेत. व त्यातून गावाला पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1 एप्रिल 1962 साली झाली. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सात सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. यांच्यामार्फत गावाचा कारभार, विकास, गावातील लोकांच्या समस्यांची सोडवणूक, गावात शासनाच्या येणाऱ्या योजना राबविणे आदी ग्रामविकासाची कार्ये केली जातात.

सरपंच
श्री. रावसाहेब मारुती पाटील

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. दिपा दत्तात्रय लोंढे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. विजय अशोक जाधव

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Yenechavandi Grampanchayat
At -Yenechavandi,Post - Halkarni, Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone :9421100315

Office : 02327– 200136